मराठी भाषेची मोडतोड फार त्रासदायक..!
मराठी भाषेवर हिंदी आणि इंग्रजीचा अतिरेकी प्रभाव पडला आहे. लोक वाट्टेल तसे बोलतात. भाषा दुरुस्त करण्याची त्यांची इच्छा नसते. मातृभाषेवर प्रेम असल्याशिवाय ती जपता येत नाही . मराठी भाषेची मोडतोड फार त्रासदायक आहे. मला त्याचे दु:ख होते . लोकांचे भाषेची पातळी खालावली आहे , असे ही उद्विग्न भावना ज्येष्ठ व्याकरणतज्ञ डॉ . यास्मिन शेख यांनी महाराष्ट्र टाइम्स शी बोलताना व्यक्त केली .
गेली ७५ वर्षे मराठी भाषा आणि तिचे व्याकरण हाच ध्यास असलेल्या डॉ .शेख सांगतात हिन्दी आणि इंग्रजीच्या अतिरेकामुळे मराठी भाषेची वाक्यरचणा चुकते . 'मी ऑकवर्ड फील करते', अशी वाक्ये सर्रास कानी पडतात. इतर भाषेतील शब्द स्वीकारण्यास माझा विरोध नाही पण ते करताना आपल्या भाषेची मोडतोड करू नका मातृभाषेचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे किमान शिकलेल्या लोकांनी आणि तज्ञांनी तरी भाषेचे जतन केले पाहिजे. लोकांना विचार कळावे म्हणून भाषा आहे. शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन लिहिले पाहिजे,' असा सल्लाही डॉ. यास्मिन शेख देतात.
'मराठी भाषा प्राचीन आहे. तिचे ज्ञानेश्वर पूर्वकालीन पुरावे उपलब्ध आहेत. महानुभवांनी लिहिलेले गद्य समोर आहे. तरी तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही असा सवाल ही त्यांनी केला. "मराठी भाषा जपावी ती अधिक समृद्ध व्हावी आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी जणांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले."
काही व्याकरणाचे धडे देताना त्यापुढे म्हणतात.....
सह्रदयी नव्हे सह्रदय असते, मृत व्यक्ती स्वर्गीय नसते; स्वर्गवासी म्हटले पाहिजे. स्वर्गीय आनंद असतो. समारंभ संपन्न झाला, म्हणजे काय? साजरा झाला असे म्हणा ना! संपन्न म्हणजे श्रीमंत होणे होय. शपथविधी घेत नसतात; शपथ घेतली म्हणा. भाजी भेटली आणि मित्र मिळाला, असे वाक्य नसते. भाजी मिळाली आणि मित्र भेटला, असे म्हणा. पाहिजेल हा शब्द मराठीत नाही. -डॉ. यास्मिन शेख. (ज्येष्ठ व्याकरणतज्ञ)
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स
छायाचित्र : सकाळ
-अविनाश मुरूमकर. (सर्वोपरिराष्ट्र)
भेट द्या: https://x.com/MAvinash1711?s=09
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा