शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६

सह्याद्री वाचवा, (लेखिका - साक्षी जगताप)

 















       


       


                    सह्याद्री माझी आई. मी माझ्या आईला सदैव येणाऱ्या संकटात झुंजताना पाहत आले ऊन,वारा,पाऊस,वादळे अंगावर झेलत लेकरांना सांभाळताना पहिले आहे.



                            माझ्या आईच्या डोळ्यात लेकरासाठी माया तर संकटासोबत भिडण्याची ताकद ही मी पहिली आहे. माझ्या आईने कधी कोणा समोर हात पसरले नाही खरं तर तशी वेळच आली नाही तिच्यावर . ती सदैव हातभरून आपल्या लेकरांना फक्त देत आहे.....त्यामुळे तिची लेकर कोणत्याही गोष्टीसाठी पोरकी राहिली नाही.सह्याद्री जवळ सर्वांसाठी मायेचा पदर आणि संकटासाठी - संघर्षा साठी लढण्याची धार आहे . याच आईच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेकर आम्ही त्याच आईची ही अशी होत असलेली अवस्था कशी पाहू शकतो..? अरे... रक्त का सळसळत नाही तुमचं? आपल्या आईची लूटमार चालू आहे, तीच चिरहरण होत आहे  लेकरांनो, तीचं अस्तित्व तीच धनदौलत सगळं काही तिच्या कडून हिरावून घेतलं जात आहे! एक निडर - खंबीर उभी असलेली आपली सह्याद्री आई आपल्या लेकरा- समोर लुटली जाते आपण फक्त पाहत बसायचं ?अरे.. जागे व्हा ...जागे व्हा हालचाल करा आपल्या आईला वाचवा ..!!


                तिचं निरागस सौंदर्य (पशु, पक्षी, प्राणी ,किटक,झाडे -झुडपे,नदी-नाले )  यांचे अस्तित्व सर्वकाही तिच्या पासून हिरावून घेतलं जात आहे माझ्या आईच्या हिरव्या शालुवर वार करून करून भोक पडलं रे....! आता तरी थांबवा हे सगळं आपली आई या मारहाणीला एकटी सामोरी जात आहे...... एकटी सगळं सहन करत आहे.... तिने आपल्याला एवढा प्रेम मातृत्व जिव्हाळा दिला उत्कृष्ट वातावरणात आपल संगोपन केलं ते सगळं हा दिवस पाहण्या साठी? 
                    बघा..बघा आपली आई रडते ओरडते त्रासाने आपल्याला हाक लावते आपली गरज आहे तिला वाचवा तिला वाचवा या राक्षसवृत्ती  नराधम विकासापासून (व्यवस्थेने ठरवलेल्या ) पासून सोडवा तिला.


                         आपल्या आईला अजून नवजात व येणाऱ्या नवीन पिढीच संगोपन करायचं आहे असं पोरक नका होऊ देऊ नका होऊ देऊ.नेहमी संकटात कणखर पने निडर पने उभी राहणारी आपली आई आपल्याच लेकरातील मेंदूला गंज लागलेल्या लेकराकडून अशक्त झाली आहे कमकुवत पडली आहे आपला आधार हवा आहे आपल प्रेम तील पुन्हा निडर आणि कणखर बनवण्या साठी तिला आपली गरज आहे तिच्या निष्पाप लेकरांना तेवढं बळ नाही पशु पक्षी ही सगळी आपली भावंड लडून लडून किती लाडणार आता आपण ज्ञात असलेली तिची लेकर आपल्यालाच तिचे रक्षण करायचे आहे उठा सज्ज व्हा आपल्या आई ला बोडक होण्या पासून वाचवू.


                                                लेखिका: साक्षी जगताप         
                                                            (BA,MA in Economics)




SOURCE-VISHAL VIMAL(MHANI






गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६

सह्याद्री वाचवा...!


 


महाराष्ट्राचे वैभव आणि जैवविविधतेचा मुख्य कणा असलेला 'सह्याद्री' (पश्चिम घाट) सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यालगतच्या कर्जत (सायडोंगर) भागात एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि सह्याद्रीच्या संरक्षणाचा प्रश्न का महत्त्वाचा आहे,


📡प्रकल्प नेमका काय आहे?

                          रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर भागात 'टॉरेंट पॉवर' (Torrent Power) या कंपनीचा ३,००० मेगावॅट क्षमतेचा 'पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प' प्रस्तावित आहे. वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जेला स्थैर्य देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वनजमिनीचा वापर आणि वृक्षतोड होत असल्याने वादाला तोंड फुटले आहे.



                         दुसरीकडे, महाराष्ट्र वन विभाग आणि शासनाने यासंदर्भातील आक्षेप फेटाळत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या मुख्य हद्दीत किंवा कोणत्याही संरक्षित क्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड होत नाही आहे. हा प्रस्तावित प्रकल्प अभयारण्य आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर, म्हणजेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या (Eco-Sensitive Zone) पूर्णपणे बाहेर आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या कायदेशीर प्रक्रियेतून देण्यात आल्या आहेत. तसेच, झालेल्या वृक्षतोडीची भरपाई करण्यासाठी टॉरेंट कंपनी आणि वन विभागामार्फत एकूण ९०,००० नवीन झाडे लावली जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
                             परंतू, यांना आहे ही झाडे जगवता येत नाहीत-दरवर्षी आहे  त्याच खड्ड्यात झाडे लावतात . झाडे लावणे म्हणजे सरकारचा फोटोशुट चा कार्यक्रम झाला आहे!  विकासाच्या नावाखाली मोठी झाडे तोडून लहान झाडे लावणे म्हणजे "हातचं सोडून , धावत्याच्या मागे लागण्या समान आहे". बर हे सर्व जाउदेत तिथल्या जैवविविधतेचं काय? प्राणी, पक्षी, कीटक, दुर्मिळ वनस्पती या सर्वांच काय? आज या जंगलतोडीमुळे तिथल्या हजारो पक्षांचा, प्राण्यांच्या अधिवास नष्ट होत आहे, माणसा प्रमाणे त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे हे आपण विसरतोय; शेवटी हे नैसर्गिक चक्र सर्वांच्या अस्तित्वाने पुर्ण होत आहे याच भान आपल्याला आज राहिलेलं नाही. आज असे प्रकल्प जवळ जवळ २३ येणार आहेत सह्याद्रीत, टॉरेंट कंपनी ही केवळ सुरुवात आहे. सह्याद्रीला लागलेली किड आहे आणि याला वेळतच ठेचाय हवं,आज आपण शांत बसलो तर उद्या ही जंगल बाघाय भेटणार नाहीत. महाराष्ट्राचा वाळवंट होतोय चित्र समोर आहे,आता तरी प्रदेशवाद आपला जागा झाला पाहिजे, या गुजराती कंपन्यांच महाराष्ट्र येणं हे केवळ योगायोग नाही तर दुरदृष्टीचे षडयंत्र आहे, आता जाग होण गरजेच आहे...आज अशक्य अस काही नाही, जर समुद्रातुन बोगदा करता येत असेल तर समुद्राच्या पाण्यावर लाईट सुद्धा बनवता येईल तेव्हा सरकारने निसर्गाच्या सान्निध्यात प्रकल्प उभारून "आयत्या पिठावर रेगुट्या वोढू नये"! सरकारी ने इच्छाशक्ती दाखवली आणि उद्योगपतींच्या हाताखालीचे माकड न होण्याचे ठरवले तर थोडा वेळ जाईल पण समुद्राच्या पाण्यावर लाईट होवु शकते यात शंका नाही, आणि या कंपन्यांना खुप खाज असेल विकासाची तर गुजरात मधे लाईट तयार करावी!


झाड तोडून विकास होत नाही! 

                                     आज आपण ज्याला 'विकास' म्हणतोय, तो जर आपल्या ऑक्सिजनचे स्रोत, पाण्याचे साठे आणि वन्यजीवांची घरे उद्ध्वस्त करून येत असेल, तर त्याला विकास म्हणायचे का? एक झाड कापायला काही मिनिटे लागतात, पण तेच झाड पूर्ण वाढून निसर्गाला समृद्ध करायला अनेक दशके लागतात. कागदावर '९० हजार नवीन झाडे लावू' असे आश्वासन देणे सोपे असते, मात्र शेकडो वर्षांची जुनी जंगले आणि तिथली नैसर्गिक परिसंस्था (Ecosystem) एका रात्रीत नवीन रोपे लावून परत आणता येत नाही. 
सह्याद्री हा महाराष्ट्राचा केवळ एक डोंगर नाही, तो आपला नैसर्गिक विमा (Natural Insurance) आहे. जर आपण विकास प्रकल्पांच्या नावाखाली इथली जंगले अशीच नष्ट करत गेलो, तर भविष्यात हवामान बदल, तीव्र दुष्काळ आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या आपत्तींना आपल्यालाच सामोरे जावे लागेल. 
खरा विकास तोच असतो जो निसर्गाला सोबत घेऊन चालतो. सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी जर आपण सह्याद्रीची हिरवी जंगले नष्ट करणार असू, तर तो विकास नसून स्वतःच्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. आता वेळ आली आहे की आपण 'निसर्गाची किंमत मोजून होणाऱ्या विकासाला' ठामपणे नकार दिला पाहिजे!

                                                                                                         लेखक- अविनाश मुरूमकर 



     
                                      

                                                                                                                    सौजन्य -बोलभिडू


                                                                                                     






शुक्रवार, ७ मार्च, २०२५

तू लढ!





 हे स्त्रिये... माते ....जननी, तुला उद्देशून; 

                     तू युगे-युगे या जुलमी पितृ सत्तेच्या जोखडाखाली स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंजत राहिली... तुझं अस्तित्व तू स्वतः निर्माण कर! तुटू दे काही परंपरा, तुटू दे ते रितीरिवाज, तुटू दे ती सर्व बंधने जिथे -जिथे तुझे अस्तित्व अडवले गेले.. तुझ्यासाठी तूच उभी रहा नको वाट पाहू इतर कोणाच्या मदतीची... नाहीतर तुझा पुन्हा एकदा मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही... आणि आणि यावर मग स्वतःची पोळी भाजून घेणारे चार-चौघेजण चार दिवस बोलत राहतील काही तर काहीजण भावना विवश होऊन बोलत राहतील पण यातुन कोणताही बदल होणार नाही.तेव्हा तू स्वतः लढ.


                नारीशक्ती ...महिला दिन... हे फक्त "पेट्रॅकल सोसायटीने" महिलेला दाखवलेला ठेंगाच! कारण आजही हीच लोक महिला दिन ठरवतात.. साजरा करतात .चार-दोन जणींचे गुणगान गातात.. आणि मग आजच्या महिलांना त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं ही कृतज्ञतेची भावना तिला कधी या पुरुषी मानसीकतेला नाही म्हणायची ताकदच देत नाही. एखादी गोष्ट न पटणारी असली तरी तिच्यावर तिला भाष्य करण्यासाठी जमतच नाही. कारण हीच लोक एकीकडे स्त्रियां विरोधी गोष्टींना खतपाणी घालत असतात आणि दुसरीकडे महिलांना नारी शक्ती... देवी,माता म्हणून त्यांचा आवाज दाबतात... कारण यातून प्रत्येक पुरुषी मानसिकतेला फक्त आपल्यापेक्षा ती वरचढ नको हेच हवंय! मग हे घरात असो की दारापासून- वेशीपर्यंत.

खरं म्हणजे स्त्रीवादाचा आव आणून जास्त काय होणार नाही! म्हणजे हा स्त्रीवाद केव्हा आहे जेव्हा पुरुषवाद आहे.  ही पुरुषी मानसीकता कुठेतरी आवाज दाबते. आणि मग आपण स्त्रीवादाचे झेंडे घेऊन मिरवण्यास मोकळे. मुळात प्रत्येक पुरुषाने हा स्वतःला प्रश्न केला पाहिजे की,"आम्ही स्वातंत्र्य देणारे कोण?"समाज हा विविधअंगी असतो, त्यात सर्व गोष्टींचा समावेश होतोच मग त्यात कोणी मोठा-कोणी बारीक हे नक्कीच असणार; आणि असं असणे पण काही चुकीचे नाही कारण.... कोणाचे तरी कोणावर वर्चस्व असेल तरच या व्यवस्थेची घडी बसेल. पण हे वर्चस्व मिळवण्यासाठी/मिळण्यासाठी काही निरपेक्ष ... निभेद... अलिंगी (लिंगाधारित भेदभाव नसणे) आयाम असायला हवेत... ज्यातून केवळ बुद्धी व नेतृत्वाचा कस लागेल व प्रत्येक जण स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करेल.

यात स्त्रीवर प्रभाव पाडण्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टींचा वापर केला जातो एक-सॉफ्ट पॉवर म्हणता येईल  व दोन-हिंसा दबाव कोंडी आणि धाक अर्थात दबावतंत्र व हिंसाचार! 

एक- सॉफ्ट पॉवर:-

     सॉफ्ट पॉवरचा विचार करता... यात ही लोक स्त्रियांना गोड बोलतात प्रेमाने वागतात प्रेमाने त्यांना हवे ते करून घेतात, काही गोष्टींची खरेदी भेटवस्तू देऊन मन धरणी करतात अर्थात या गोष्टी स्त्रिया देखील पुरुषांबाबत करतात. तेव्हा ही गोष्ट बुद्धीच्या सामर्थ्यावर अवलंबून असल्याकारणाने यात काही चुकीचे नाही असे म्हणायला हरकत नाही. 

दोन - दबावतंत्र व हिंसाचार:-

 दुसऱ्या गोष्टीचा विचार करता (ज्यात हिंसा, दबाव, कोंडी ,धाक, मारहाण इ.) स्त्रीला तिच्या अस्तित्वासाठी कोठून झगडायचे आहे ते समजते. म्हणजे आज साक्षर स्त्रियांचा लढा हा आम्हाला समाजात बरोबरीचे स्थान दिले जात नाही किंवा आम्हाला नेहमी दुय्यम समजले जाते यासाठीच आहे. (उदा. आयटी सेक्टर मध्ये काम करताना दिली जाणारी पदोन्नती मध्ये  पुरुषाला दिले जाणार काही प्रमाणातील  प्राधान्य) 

पण याची दुसरी बाजू हीदेखील आहे की, यातील काही स्त्रियांना.. खास करून ग्रामीण भागातील स्त्रियांना अक्षरशः जीव देण्याची वेळ येते. म्हणजे ती तिच्या नवऱ्याला तुमचं चुकत आहे किंवा काही गोष्टींची विचारणा त्यांच्याकडे केली,ति तिच्या मुला बाळांच्या उजव्व भविष्यासाठी काय चुकीचं आहे व काय बरोबर हे बोलली तरी पुरुषी अहंकार दुखावतो, तो तिच्यावर हात उचलतो तिच्यावर हिंसाचार करतो. पण ती त्यावर त्याला उत्तर म्हणून पुरुषावर हात उचलत नाही! नाही म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करता हे प्रखरपणे दिसून येते की, आपण कितीही झाशीची राणी, सावित्री, बहिणाबाई यांचे गोडवे गायले तरी हे कठोर सत्य आहे की त्यांनी त्यांचे अस्तित्व निर्माण केले होते बुद्धी व नेतृत्वाच्या जोरावर. म्हणजे यातून स्पष्ट होते की येथे तेच वर येऊ शकतात ज्यांच्यात लढायची स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची अर्थात वेगळी ओळख निर्माण करण्याची आग असेल ...हिम्मत असेल. 

       मी येथे स्त्री सुरक्षा... समान हक्क.. अत्याचार, त्यावर उपाययोजना.. यावर बोलतच नाहीये कारण हे सर्व विषय द्वितीय स्तरावरील आहेत जेव्हा तुम्ही साक्षर व्हाल तेव्हा तुम्ही काय चुकीचे व काय बरोबर हे पाहू शकाल तेव्हा तुम्ही तुमची मते ठामपणे मांडू शकाल. तेव्हा खऱ्या अर्थाने सुरक्षा... समान हक्क... आत्याचार इ. गोष्टींवर भाष्य करणे उचित ठरेल. कारण जेव्हा तुम्ही साक्षर व्हाल आणि तुमची धाव फक्त "चुल ते फार फार तर घराचा उंबरठा " इथपर्यंत मर्यादित ठेवणार नाही तेव्हा कुठेतरी बदल घडेल. साक्षर होऊन जेव्हा तुम्ही बाहेर पडाल चूल आणि मूल कुठेतरी ही प्रथम मोडीत काढाल जेव्हा आपण आपल्या पायावर उभे असाल... तेव्हा समान हक्क.. अत्याचार.. सुरक्षा इत्यादी प्रश्न उरणारच नाहीत. कारण अशा प्रश्नांना आपण पाय फुटूनच देणार नाही. (अर्थात तुमच्यावर अन्याय होताच आवाज उठवाल) व पर्यायाने हे प्रश्न निर्माणच होणार नाही. 

शेवटी एवढाच म्हणेल की, 

             प्रत्येक संकटासाठी तुला येसूबाई व्हायचंय...                    तुला ज्ञानासाठी सावित्री व्हायचंय; आणि ते होताना तू कोणा जोतिबाची अपेक्षा करू नको, तुला दुसऱ्याच्या जगण्यासाठी सिंधुताई सपकाळ व्हायचंय.... आणि तुला यातील काहीच नाही होता आलं तर निदान स्वतःसाठी लढा देऊ शकशील एवढी हिंमतवान हू ! मला माहित आहे हा प्रवास तुझ्यासाठी फार कठीण असेल पण या प्रवासात माझ्यासारखा एखादा सखा तुला हात देईल.. तो हात उसनाच समज नाहीतर तू त्यावर अवलंबून राहशीलतू...तु लढ.. तू खचू नको.. तुझ्या प्रवासात प्रत्येक बोचणाऱ्या काठ्यानंतर तुझ्या स्वागतासाठी फुलांची माळ असेल... तू फक्त लढ! 


                                -Avinash D.Murumkar


शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

The great Geographer Aryabhatta / महान भूगोल शास्त्रज्ञ आर्यभट !

         महान भूगोल शास्त्रज्ञ आर्यभट !

 


प्रतिभेची ज्योती आणि उपेक्षेचा अंधार यातील सुप्त संघर्षाच्या कहानीचे दुसरे नाव आहे - आर्यभट. मुळात 'ज्योतिशास्त्र' हा शब्दच 'ज्योति:शास्त्र' पासून आला आहे. वैदिक ज्योतिष म्हणजे 'वेदांग ज्योतिष्य'. हा प्रत्यक्ष वेदांचा भाग नसून वेदांची छंद, निरुक्त, व्याकरण इ. सहा अंगांपैकी एक आहे. ऋग्वेद चारही वेदांचे वेदांग ज्योतिष ग्रंथ आहेत. त्यांचा काळ इ. स. पूर्व १५०० मानला जातो. त्यातुन पुढे ब्राह्म, पौलिश, रोमन, वसिष्ठ व सूर्य हे पाच ज्योतिष्य सिद्धांत विकसित झाले. पण नंतर त्या पाचही सिद्धांतांतील सूत्रे आणि गणिते यांचा ताळमेळ प्रत्यक्ष निरीक्षणाशी लागेणा . अर्थातच वेदांग ज्योतिषानंतर सुमारे दीड हजार वर्षांच्या काळातील ज्योतिषावरचा ग्रंथ उपलब्ध नाही.


या सर्व पार्श्वभूमीवर पाचव्यात आर्यभट नावाची ज्योत प्रकटली. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल माहिती उपलब्ध नाही. इ. स. ४७६ मध्ये त्यांचा जन्म व शिक्षण बिहारमधील कुसुमपूर (बहुधा सध्याचे पाटणा) या गावी झाले. आर्यभट हे 'कुलप' म्हणजे कुलपती होते असा उल्लेख आहे. यावरुन ते नालंदा विद्यापीठात खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख प्रमुख असावेत. बिहारमधील तारेगना येथे आरभटांनी वेधशाळा उभारली होती असेही मानले जाते. त्या सुमारास गुप्त उतरणीस लागले होते. पण नालंदा हे जगातील मोठे ग्रंथालय व  ज्ञानकेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तिथे एक  वेधशाळा ही होती. बहुधा तिथेच आर्यभटांनी आपला 'आर्यभटीय' हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. ते वर्ष होते इ. स. ४९९ आणि त्या वेळी त्यांचे वय होते २३. ज्योतिष सिद्धांत प्रत्यक्ष निरीक्षण यातील त्रुटी या ग्रंथामुळे दुर झाल्या . हा ग्रंथ ब्राह्मसिद्धांतावर आधारित असून त्याची विभागणी दशगीतकापाद, गणितपाद कालक्रियापाद व   गोलपाद या चार भागात केलेली आहे. पर्याय आहे.  सांकेतिक संख्यालेखन पद्धतीचा वापर करून लिहिलेला असल्याने तो वरकरणी क्लिष्ट व दुर्बोध वाटला तरी श्लोकबद्ध रुपात त्यात अतिशय  कमी शब्दांत प्रचंड माहिती आहे. १२३ श्लोकांच्या या ग्रंथातील आशय, सूत्रे व तपशील पुर्ण  उलगडून मांडायचा तर शेकडो  पानांचे ग्रंथ होतील. त्यातील सुत्रे व आकडेवारी  अद्ययावत तुलनेतही अचुक  ठरलेली आहे. त्यापैकी काही  उदाहरणे अशी.... आर्यभटांनी दिलेला एक नक्षत्रदिनाचा  कालावधी  २३ तास ५६ मिनिटे ४.१ सेकंद आहे, तर त्याचा आधुनिक कालावधी २३ तास ५६ मिनिटे ४.०९१ सेकंद आहे. त्यांनी दिलेला शुक्राचा युतीकाल ०.६१५२० एवढा आहे, तर आधुनिक युतीकाल ०.६१५२१ एवढा आहे. ग्रहांची सूर्यापासून त्यांनी दिलेली तुलनात्मक सरासरी अंतरे  पुढीलप्रमाणे आहेत. आधुनिक अंतरे कंसात दिली आहेत. बुध ०.३७५ (०.३८७), शुक्र ०.७२५ (०.७२३), मंगळ १.५३८ (१.५२३), गुरु-५.१६ (५.२), शनी-९.४१ (९.५४). याचप्रमाणे चंद्र, बुध, मंगळ, गुरू व शनी यांचा नक्षत्रभ्रमण काळ त्यांनी  जवळपास अचुक दिला आहे.


ग्रहणे ही राहू-केतू मूळे नव्तहे तर चंद्राच्या छायेमुळे लागतात हे आर्यभटांनी दीड हजार वर्निःषांपूर्वी नि:संदिग्धपणे सांगितले. पृथ्वीच्या छायेची लांबी त्यांनी अचुक दिली आहे . आश्चर्य म्हणजे  चंद्रावर १५ दिवसांचा दिवस आणि १५ दिवसांची रात्र असते, हेही त्या काळात त्यांनी नोंदविले.


पृथ्वी गोल  असुन ती स्वता: भोवती फिरते व त्यामुळे दिवस-रात्र, हे सांगणारे आर्यभट पहीलेच भूगोलतज्ञ होते. या परिवलनासाठी त्यांनी 'भूभ्रम' असा शब्द वापरला. यासाठी नदीप्रवाहात नावेतून जाताना काठावरील वस्तू मागे जाताना दिसतात हे उदाहरण त्यांनी दिले. इतकेच नाही तर पृथ्वीच्याच परिवलन गतीने (२४ तासात एक फेरी) फिरणाऱ्या गोलयंत्राची माहितीही त्यांनी गोलपाद या भागात दिली आहे. दुर्दैवाने पुढे वराहमिहीर, ब्रह्मगुप्त इ. नी आर्यभटांची ही परिवलन संकल्पना फेटाळली व हा सिद्धांत दुर्लक्षित राहिला. आर्यभटांचा 'आर्यभट सिद्धांत' नावाचा आणखी एक ग्रंथ होता. वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, इ.नी त्याचा उल्लेख केलेला आहे. मात्र एकेकाळी भारतभर पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जाणारा 'आर्यभट सिद्धांत' हा ग्रंथ आता उपलब्ध नाही.


    त्याच सुमारास वराहमिहीर हे गुप्त राजांच्या दरबारात ज्योतिषी होते. इ. स. ५०५ मध्ये त्यांनी पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहिला. याशिवाय त्यांचे 'बृहत्संहिता' व इतर अनेक ग्रंथ आहेत. तारे, ग्रह, ग्रहणे, धूमकेतू इथपासून ते ढग आणि भूकंपापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लिहिले आहे. वराहमिहिरांनी भविष्य व फलज्योतिष्य यावरच भर दिला नसता तर ते पहिले मोठे भूगोल संशोधक ठरले असते. त्यानंतर भास्करचार्य पहिले यांनी ५२९ मध्ये आर्यभटियावर भाष्य आणि महाभास्करीय व लघुभास्करीय हे दोन ग्रंथ लिहिले.


         पुढे बह्मगुप्त यांनी इ. स. ५९० मध्ये ब्राह्मसिद्धांत व ६३० मध्ये खंडखाद्यक हे ग्रंथ लिहिले. दहाव्या शतकात या ग्रंथांची 'सिंद हिंद' व 'अल अर्कंद' ही अरबी भाषांतरे झाली. त्या ग्रंथामार्फतच दशमान पद्धत व शून्याचा शोध अरबस्तानात गेला. पण या सर्वांहून आर्यभट वेगळे व महान ठरले. भविष्य व फलज्योतिष्याचा मोह टाळून आपल्या पूर्ण ग्रंथाचे विशुद्ध शास्त्रीय स्वरूप त्यांनी कायम राखले. त्यामुळे अचूकता, सूक्ष्मता आणि नावीन्यपूर्ण पद्धती असणारा त्यांचा ग्रंथ जगप्रसिद्ध झाला. नवव्या शतकात बगदादमध्ये 'आर्यभटीय'चे अरबीत भाषांतर करण्यात आले. विद्वान इतिहासकार अलबेरुनी यांच्या १०३० मधील 'अलबेरुनीचा भारत' मध्ये आर्यभटांचा वारंवार उल्लेख आहे. अल फाझरी व याकूब यांनी 'आर्यभटीय' चे भाषांतर पूर्वीच अरबीत केल्याची माहिती अलबेरुनींनी दिली आहे. डॉ. केर्न या नेदरलँडच्या विद्वानाने १८७४ मध्ये 'आर्यभटीय'चे इंग्रजीत भाषांतर केले. आधुनिक काळात अनेक पाश्चात्त्य विद्वानांनी आर्यभटांना गौरविले आहे.


   पण भारतात मात्र आर्यभट हे आपल्या भूगोल व विज्ञानाच्या उपेक्षेचे प्रतीक ठरले. कदाचित भविष्यकथन आणि फलज्योतिष्य या लोकप्रिय व राजाश्रयी मार्गापासून दूर राहण्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. दीड हजार वर्षे राज्यकर्ते व इतर विद्वानांनी आर्यभटांची नोंदच घेतली नाही. त्यांचा मृत्यू इ. स. ५५० मध्ये झाला असे मानले जाते.

    पण तो नक्की केव्हा, कुठे झाला हेही अज्ञात आहे. इ.स. ५२५ ते १५०२ या काळात 'आर्यभटीय'वर प्रभाकर, भास्कराचार्य, इ.नी काही भाष्ये लिहिली. पण पुढील ५०० वर्षे, ग्रहणात पृथ्वीच्या सावलीची लांबी सांगणारे आर्यभट आणि त्यांची भूगोल व खगोलविद्या हे सारे विस्मृतीच्या काळोखात हरवून गेले. त्या काळातील पुराणे, असंख्य काव्ये, कथा, मिथके आणि सत्य व काल्पनिक चरित्रे यांनी भारतीय साहित्यं भरलेले आहे. पण त्यात किंवा ऋषीमुनींच्या यादीत वास्तवात होऊन गेलेल्या आर्यभटांचे नाव आढळत नाही. हजार वर्षापूर्वी अरबीत व नंतर इंग्रजीतही भाषांतर झालेले 'आर्यभटीय' परवापर्यंत आपल्याचं देशातल्या मराठी भाषेत उपलब्ध नव्हते.


पण हजारो वर्षांच्या उपेक्षेचा काळोखही प्रतिभेच्या तेजाला गिळंकृत करू शकत नाही. ४९ वर्षांपूर्वी अचानक आर्यभट उपेक्षेच्या अंधारातून बाहेर आले. १९७५ मध्ये भारताने आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला, त्याला आर्यभटांचे नाव देण्यात आले विश्वकोश व इतर ग्रंथांत त्यांची माहिती प्रकाशित होऊ लागली. जगप्रसिद्ध प्रतिष्ठित 'नेचर'च्या २००१ मधील एका अंकातं आर्यभटांच्या एका कोष्टकावर लेख प्रकाशित झाला. २००९ मध्ये 'आर्यभटीय' वर मराठीत स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झाले. आता त्यांच्या ग्रंथाच्यां अभ्यासाची प्रत्येक विद्यापीठात व्यवस्था करणे हेच त्यांच्या उपेक्षेचे प्रायश्चित्त ठरेल. तीच आर्यभटांना आदरांजली आणि भावी पिढीला प्रेरणा ठरेल.

स्त्रोत: लोकसत्ता, 

लेखक : श्री.एल.के.कुलकर्णी (भूगोल अभ्यासक)

E-mail: lkkulkarni@gmail.com


By,

Mr.Avinash D.Murumkar






शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

"सन्मानाने मृत्यू"साठी मार्गदर्शक तत्वे....


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अत्यवस्थ रुग्णाच्या परिस्थितीमध्ये उपचाराने सुधारणा होण्याची शक्यता नसल्यास अशा रुग्णांना सन्मानाने मृत होण्याचा हक्क दिला आहे. मात्र रुग्णाचे इच्छापत्र/सहमतीपत्र आवश्यक..!



सन्मानाने मृत होण्याचा अधिकार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने वैद्यकीय समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन स्तरावर स्थापन करण्यात आली आहे. 

इच्छापत्र करण्यासंदर्भात कार्यपद्धती व अंमलबजावणीची कार्यपद्धती न्यायालयाने निश्चित केली आहे. रुग्णाला त्याच्या इच्छापत्रानुसार सन्मानाने मृत होण्याचा अधिकार बहाल करण्यासाठी विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून 48 तासात निर्णय घेण्यासाठी जबाबदार यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर प्राथमिक वैद्यकीय मंडळ व द्वितीय वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे.


इच्छापत्र काय आहे ‌...?

               वैद्यकीय उपचारबाबत डॉक्टरांना सुचना देणारे पत्र म्हणजे इच्छापत्र होय. हे स्टॅम्प पेपरवर केले जाते. औषधोपचार व जीवन साहाय्य उपकरणाने आजारपणात सुधारणा होण्याची शक्यता नसल्यास अधिकचे उपचार न करता सन्मानाने मृत्यूचा अधिकार द्यावा. असे नमूद करावे लागणार आहे.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

 

MANTRALAY
MANTRALAY - MAHARASHTRA GOVERNMENT


         

NEW,

Devendra Fadnavis back as Maharashtra CM, ‘to work together’ with deputies Eknath Shinde, Ajit Pawar


   

The new government was formed after two weeks of negotiations. Mr. Fadnavis said, “Chief Minister or Deputy Chief Minister is just a technical arrangement. The three of us will work together.”


Governor C.P. Radhakrishnan administered the oath of office and oath of secrecy to Mr. Fadnavis, who steered the BJP-led Mahayuti to victory in the State elections last month, in the presence of Prime Minister Narendra Modi, several Union Ministers, and Chief Ministers and Deputy Chief Ministers of NDA-ruled States. Outgoing Chief Minister Eknath Shinde, leader of a breakaway Shiv Sena faction, took the oath as Deputy Chief Minister, alongside Nationalist Congress Party (NCP) president Ajit Pawar. No other leader was inducted into the Council of Ministers, with the Cabinet formation expected next week.


सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी (2024-25) / Maharashtra Assembly Elections (2024-25)


Maharashtra Assembly Elections 


मतदानाची वेळ:- सकाळी 7:00 ते सायंकाळी 6:00

 मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी...

० Voter Helpline 

० www.ceo.maharashtra.gov.in

० https://electoralsearch.in

० Toll Free No.1950 ☎️


मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र चालेल....

० मतदार ओळखपत्र 

० Pasport (पार पत्र), वाहन चालक परवाना (Licence)

० मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा कार्ड

० छायाचित्रे असलेले निवृत्तीवेतन दस्तऐवज..

० Pancard (पॅनकार्ड)

० आधार कार्ड 

० छायाचित्रे असलेले बॅंकेचे/टपाल कार्यालयाचे पासबुक 


*मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा*

*ECI <space> (तुमचा मतदार आयडी) 1950 वर पाठवा*

*उदाहरणार्थ:*

*ECI XYZ1234567*


*1950 वर पाठवा*


*15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप मिळेल.*


०100 मीटर परिसरात मोबाईलला बंदी..

     

  *निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास मनाई आहे.*


*तसेच राजकीय पक्षाचे नाव -चिन्ह असलेल्या मतदार चिट्ट्यांचे वाटप नाही.. 

                    मतदान दिवशी मतदार यादीत नाव शोधुन देण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून मतदान केंद्रापासून 200 मीटर दुरवर व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक टेबल, दोन खुर्च्या आणि दोन मदतनीस अशी मुभा देण्यात आली आहे. याठिकाणी राजकीय पक्षाचे चिन्ह, नाव किंवा मतदार चिट्ठी वाटप करण्यास मज्जाव केला आहे.

कृपया हे सर्वांशी शेअर करा आणि स्वतःसाठी देखील खात्री करा.


Follows on_X :- https://x.com/MAvinash1711

Or 

@MAvinash1711 (X)


Contact:- Comment Box 

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

देवमाणूस!

 

मा.रतन टाटा 


Dear sir,

    आपल्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर आपल्याला भेटण्याची फार मोठी इच्छा होती, मुंबई आल्यावर भेटण्याचा प्रयत्न देखील करणार होतो. त्यापुर्वीच आपल्या जाण्याची बातमी मिळाली. सर, आपल योगदान, आपलं कार्य, तो साधेपणा, समाज्याप्रतिची भावना, देश प्रेम किती विविधांगी रूपे होती ; आपल्या सारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही!

     ‌सर, सन 2023 साली आपल्याला भारतरत्न मिळावा यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्याचं ठरविले... त्यानुसार माझ्या मित्रांनी आणी मी स्वाक्षरी देखील केली...पुढे अभियान राबविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याआधी थोडी माहिती घ्यायचं ठरवलं.... तेव्हा समजले की माझ्या आदी देखील.... खुप जाणांनी स्वाक्षरी अभियान, ट्विटर_हॅशटॅग वापरत सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला होता... किंबहुना ही लढाई आपल्याला भारतरत्न मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) देखील गेले. तरीही सरकारला काही पाझर फुटला नव्हता, शेवटी आपण स्वतः पुढे येवून विनंती केली की, हे सर्व थांबवा ! तेव्हा मला वाटले की माझ्या स्वाक्षरी अभियानाने फार फरक पडेल असं दिसत नाही. आणि मग स्वाक्षरी अभियान थांबवल. परंतु मला आतुन नेहमी  अस्वस्थ जाणवत असे, काही तरी राहतय, मी प्रयत्न केले नाहीत ही गोष्ट मला शांत बसु देत नव्हती. नंतर ठरवलं की  अधीकारी वगैरे झाल्यावर... सरकार पर्यंत पोहचायला सोपं होईल; तसं मनाला पण वेळोवेळी सांगत आलो. शेवटी काही दिवसांपूर्वी आपली प्रकृती चिंताजनक असल्याने हॉस्पिटलमध्ये ICU विभागात ठेवल्याचे समजले.

आणि फार भिती वाटू लागली दोन तीन दिवस उलटून ही आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समजली नाही. तेव्हा तातडीने भारत सरकारला पत्र लिहायचे ठरवले... आणि 8/10/2024 रोजी दुपारी पत्राचा ड्राफ्ट तयार केला; स्वाक्षरी केली आणि 9/10/2024 रोजी राष्ट्रपती, प्रधानमंत्री कार्यालय आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्र पाठविले.. त्या पत्राचा शेवचा मजकूर कहीसा असा होता...

            "इतिहास सब की नोंद लेता है । और मै चाहता हूं की इतिहास हमेशा भारत का गौराणवित हो; जिसमे भारत के प्रती आपणा योगदान देणे वालों की नोंद रहे ।

 उणके पश्चात उनको भारतरत्न दिया गया तो उसका कोई अर्नथ नहीं रहेगा, इसीलीए मै चाहता हूं की  सरकार उणके जितेजी उणका हक उन्हे दे । उनको भारतरत्न देणे से भारतरत्न की भी शोभा बढेगी , उनकी तबीएत दिन भर दीन बिघडती जा रही हैं। रतन टाटा जी की , बिघडती तबीएत उन्हे हमसे जदुा करणे से पहले कृपया उन्हे भारतरत्न प्रधान करें।"


आणि रात्री आपल्या जाण्याची बातमी मिळाली, खुप मोठा धक्का होता अश्रू अनावर झाले... शेवटी आपल्याला जिवंतपणी आम्ही भारतीय भारतरत्न देऊ न शकल्याचं दु:ख आहे. शक्य झाल्यास मला माफ करा. शेवटी एवढंच म्हणेल आपल्या मरणोपरांत तरी भारतरत्न आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. थांबतो आता...या पलीकडे लिहणे शक्य नाही अश्रू अनावर झालेत... आपल्या आत्म्यास शांती लाभो...! माझ्या महान व्यक्तीमत्वला माझा आखेरचा सलाम!!



शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

भाषा आणि व्याकरण / डॉ . यास्मिन शेख

               




     मराठी भाषेची मोडतोड फार त्रासदायक..! 

         मराठी भाषेवर हिंदी आणि  इंग्रजीचा अतिरेकी प्रभाव पडला आहे. लोक वाट्टेल तसे बोलतात. भाषा दुरुस्त करण्याची त्यांची इच्छा नसते. मातृभाषेवर प्रेम असल्याशिवाय ती जपता येत नाही . मराठी भाषेची मोडतोड फार त्रासदायक आहे. मला त्याचे दु:ख  होते . लोकांचे भाषेची पातळी खालावली आहे , असे ही उद्विग्न  भावना ज्येष्ठ व्याकरणतज्ञ डॉ . यास्मिन शेख यांनी  महाराष्ट्र टाइम्स शी बोलताना व्यक्त केली . 

        गेली ७५ वर्षे मराठी भाषा  आणि तिचे व्याकरण हाच ध्यास असलेल्या  डॉ .शेख सांगतात हिन्दी आणि इंग्रजीच्या अतिरेकामुळे मराठी भाषेची वाक्यरचणा चुकते . 'मी  ऑकवर्ड फील करते', अशी वाक्ये सर्रास कानी पडतात. इतर भाषेतील शब्द स्वीकारण्यास माझा विरोध नाही पण ते करताना आपल्या भाषेची मोडतोड करू नका मातृभाषेचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे किमान शिकलेल्या लोकांनी आणि तज्ञांनी तरी भाषेचे जतन केले पाहिजे. लोकांना विचार कळावे म्हणून भाषा आहे. शब्दांचा अर्थ लक्षात घेऊन लिहिले पाहिजे,' असा सल्लाही डॉ. यास्मिन शेख देतात. 

        'मराठी भाषा प्राचीन आहे. तिचे ज्ञानेश्वर पूर्वकालीन पुरावे उपलब्ध आहेत. महानुभवांनी लिहिलेले गद्य समोर आहे. तरी तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही असा सवाल ही त्यांनी केला. "मराठी भाषा जपावी ती अधिक समृद्ध व्हावी आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी जणांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले."

काही व्याकरणाचे धडे देताना त्यापुढे म्हणतात.....

सह्रदयी नव्हे सह्रदय असते, मृत व्यक्ती स्वर्गीय नसते; स्वर्गवासी म्हटले पाहिजे. स्वर्गीय आनंद असतो. समारंभ संपन्न झाला, म्हणजे काय? साजरा झाला असे म्हणा ना! संपन्न म्हणजे श्रीमंत होणे होय. शपथविधी घेत नसतात; शपथ घेतली म्हणा. भाजी भेटली आणि मित्र मिळाला, असे वाक्य नसते. भाजी मिळाली आणि मित्र भेटला, असे म्हणा. पाहिजेल हा शब्द मराठीत नाही.                                                                                                                                                    -डॉ. यास्मिन शेख.                                                        (ज्येष्ठ व्याकरणतज्ञ)

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स 

छायाचित्र : सकाळ 

                                                                                                             -अविनाश मुरूमकर.                                                        (सर्वोपरिराष्ट्र)



भेट द्या: https://x.com/MAvinash1711?s=09




बुधवार, १३ मार्च, २०२४

CAA : (नागरिकत्व दुरुस्ती कायदा)

 

CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच Citizenship Amendment Act आहे तरी काय?


CAA-Citizenship Amendment Act 




नागरिकत्व सुधारणा कायद्याची (CAA) अधिसूचना 11 मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.

नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 च्या नियमानुसार 2019 च्या कायद्यांतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी अर्ज करता येईल.

यासाठी सरकारच्या वेब पोर्टलवर नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येतील.

या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.


काय आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019?

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.

सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.

यासाठी यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती.


नागरिकत्व कायदा, 1955 काय आहे?

नागरिकत्व कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे.

या कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे - 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015.

कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या तीन प्रकारे गमावू शकते -

० जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल

० जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं

० जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय?

हा कायदा मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.

ईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररीत्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून, आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यातच, राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून (National Citizenship Register / NCR) बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय.


हे विधेयक राज्यसभेत पुन्हा का मांडलं गेलं?

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे विधेयक जेव्हा मांडण्यात आलं होतं, तेव्हा त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, पारशी, आणि शीख यासारख्या हिंदूएतर धर्मांच्या लोकांना नागरिकत्व देण्याची तरतूद होती. मात्र या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2016 मध्ये मुस्लिमांचा कुठेही उल्लेख नव्हता.

हे विधेयक लोकसभेत तर संमत झालं पण त्यानंतर राज्यसभेत ते अडकलं. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका झाल्या.

कुठलंही विधेयक एका सरकारच्या कार्यकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. जर तसं करण्यात सरकारला यश आलं नाही आणि निवडणुका झाल्या तर ते विधेयक निष्प्रभ ठरतं. त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेत मांडलं गेलं.

आणि अखेर ते राज्यसभेत यंदा संमत झालं. त्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर त्याला कायद्याचं अधिकृत रूप मिळालं.

                                                   

                                          -AVINASH D. MURUMKAR



SOURCE: BBC News, Socail media ,
                 govt. information , News paper.




शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

GULJAR/ गुलजार


GULJAR/ गुलजार



                प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना यंदाचा ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.


                 सन १९४४पासून देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार दर वर्षी भारतीय साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी योगदानासाठी दिला जातो. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा; तर उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा देण्यात येत आहे. याग्देवीची प्रतिमा, २१ लाख रुपये, आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


                 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. निवड समितीत माधव कौशिक, दामोदर मावजो, प्रा. सुरंजन दास, प्रा. पुरुषोत्तम बिलमाले, प्रफुल्ल शिलेदार, प्रा. हरीश त्रिवेदी, प्रभा वर्मा, डॉ. जानकीप्रसाद शर्मा, ए. कृष्णा राय आणि 'ज्ञानपीठ'चे संचालक मधुसूदन आनंद यांचा समावेश होता.


शब्दांचा जादुगार :-

                 गुलजार या नावाने ओळखले जाणारे संपूरणसिंग कालरा हे प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात; तसेच आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट उर्दू कवींपैकी एक आहेत. गुलजार यांना २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४मध्ये पद्मभूषण सन्मान आणि पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. २००९ मध्ये ऑस्कर पुरस्कार आणि २०१० मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळवलेले 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' हे गाणे आणि 'माचिस' (१९९६), 'ओमकारा' (२००६), 'दिल से... (१९९८) आणि 'गुरू' (२००७) या समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांतील गुलजार यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. गुलजार यांनी 'कोशिश' (१९७२), 'परिचय' (१९७२), 'मौसम' (१९७५), 'इजाजत' (१९७७) या सिनेमांचे आणि 'मिर्झा गालिब' (१९८८) या दूरचित्रवाणीवरील मालिकेचे दिग्दर्शन केले, गुलजार यांनी 'त्रिवेणी' या तीन ओळींचा नथा काव्यप्रकार उर्दूमध्ये आणला, त्यांनी बालकवितेतही योगदान दिले आहे.


 संस्कृत भाषेसाठी ;- जगद्गुरू रामभद्राचार्य 

  उर्दू भाषेसाठी ;-  प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार .





                                                                         -AVINASH D. MURUMKAR



शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०२४

निवडणूक रोखे रद्द!

SUPREME COURT


#A LANDMARK JUDGMENT OF SUPREM COURT....


 निवडणूक रोखे(Electoral Bond)रद्द करण्यात आले आहेत. म्हणजे नेमकं काय?


मार्च 2018 मध्ये निवडणूक रोखे (Electoral Bonds) सुरू केले होते. ह्या अंतर्गत कोणीही नाव गुप्त ठेवून कोणत्याही पक्षाला देणगी देऊ शकत होते. स्टेट बँक ऑफ इंडियामधुन विशिष्ट कालावधीमध्येच हे बाँड्स विकत घ्यावे लागत. एक हजार रुपयांपासुन ते एक कोटीपर्यंत रोखे(bonda) काढता येत.



सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे (Electoral Bonds)रद्द केले? 

माहितीचा अधिकार(Right to information)अंतर्गत राजकीय पक्षाकडे निधी कसं..? आणि कुठून येतो..? हे जाणून घेण्याचा हक्क नागरिकांकडे  आहे. या bonds ची माहिती नागरिकांना पासून लपविणे हे असंविधानीक आहे. असे सांगत.. सर्वोच्च न्यायालयाने (Suprime court) निवडणूक रोखे(Electoral Bonds) रद्द केले आहेत.



सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत? 

SBI ने एप्रिल 2019 पासून आत्तापर्यंतच्या सर्व  बाँड्सची माहिती 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी. निवडणूक आयोगाने 13 मार्च पर्यंत ही माहिती आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावी. राजकीय पक्षांनी जे बॉण्ड्स अजूनपर्यंत जमा केले नाहीत ते परत करावेत.



यातून आगामी काळातील निवडणुकीत पारदर्शकता येईल! भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपयोग होईल शिवाय सामान्य नागरिकांना सरकार हितसंबंधी गटाला पुरक असे निर्अणय घेत आहे की भेदभाव विरहित हे पाहणे सोपे होईल. खऱ्या अर्थाने लोकशाहीला या निर्णयामुळे मजबुती मिळाली आहे. शिवाय निवडणुकांमध्ये अधिक पारदर्शकता येईल!