सह्याद्री माझी आई. मी माझ्या आईला सदैव येणाऱ्या संकटात झुंजताना पाहत आले ऊन,वारा,पाऊस,वादळे अंगावर झेलत लेकरांना सांभाळताना पहिले आहे.
माझ्या आईच्या डोळ्यात लेकरासाठी माया तर संकटासोबत भिडण्याची ताकद ही मी पहिली आहे. माझ्या आईने कधी कोणा समोर हात पसरले नाही खरं तर तशी वेळच आली नाही तिच्यावर . ती सदैव हातभरून आपल्या लेकरांना फक्त देत आहे.....त्यामुळे तिची लेकर कोणत्याही गोष्टीसाठी पोरकी राहिली नाही.सह्याद्री जवळ सर्वांसाठी मायेचा पदर आणि संकटासाठी - संघर्षा साठी लढण्याची धार आहे . याच आईच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेकर आम्ही त्याच आईची ही अशी होत असलेली अवस्था कशी पाहू शकतो..? अरे... रक्त का सळसळत नाही तुमचं? आपल्या आईची लूटमार चालू आहे, तीच चिरहरण होत आहे लेकरांनो, तीचं अस्तित्व तीच धनदौलत सगळं काही तिच्या कडून हिरावून घेतलं जात आहे! एक निडर - खंबीर उभी असलेली आपली सह्याद्री आई आपल्या लेकरा- समोर लुटली जाते आपण फक्त पाहत बसायचं ?अरे.. जागे व्हा ...जागे व्हा हालचाल करा आपल्या आईला वाचवा ..!!
तिचं निरागस सौंदर्य (पशु, पक्षी, प्राणी ,किटक,झाडे -झुडपे,नदी-नाले ) यांचे अस्तित्व सर्वकाही तिच्या पासून हिरावून घेतलं जात आहे माझ्या आईच्या हिरव्या शालुवर वार करून करून भोक पडलं रे....! आता तरी थांबवा हे सगळं आपली आई या मारहाणीला एकटी सामोरी जात आहे...... एकटी सगळं सहन करत आहे.... तिने आपल्याला एवढा प्रेम मातृत्व जिव्हाळा दिला उत्कृष्ट वातावरणात आपल संगोपन केलं ते सगळं हा दिवस पाहण्या साठी?
बघा..बघा आपली आई रडते ओरडते त्रासाने आपल्याला हाक लावते आपली गरज आहे तिला वाचवा तिला वाचवा या राक्षसवृत्ती नराधम विकासापासून (व्यवस्थेने ठरवलेल्या ) पासून सोडवा तिला.
आपल्या आईला अजून नवजात व येणाऱ्या नवीन पिढीच संगोपन करायचं आहे असं पोरक नका होऊ देऊ नका होऊ देऊ.नेहमी संकटात कणखर पने निडर पने उभी राहणारी आपली आई आपल्याच लेकरातील मेंदूला गंज लागलेल्या लेकराकडून अशक्त झाली आहे कमकुवत पडली आहे आपला आधार हवा आहे आपल प्रेम तील पुन्हा निडर आणि कणखर बनवण्या साठी तिला आपली गरज आहे तिच्या निष्पाप लेकरांना तेवढं बळ नाही पशु पक्षी ही सगळी आपली भावंड लडून लडून किती लाडणार आता आपण ज्ञात असलेली तिची लेकर आपल्यालाच तिचे रक्षण करायचे आहे उठा सज्ज व्हा आपल्या आई ला बोडक होण्या पासून वाचवू.
लेखिका: साक्षी जगताप
(BA,MA in Economics)
SOURCE-VISHAL VIMAL(MHANI

