बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३
समलिंगी विवाह आणि सुप्रीम कोर्ट....!!
सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३
कोण या तिघी....? (नवरात्र)
*तीनही देवींचा आशीर्वाद हवा, म्हणून तो 'नवरात्री' साजरी करतो.*
*कोण या तिघी...?*
पहिली त्याला जन्म देते,
दुसरी या जन्मात त्याला भेटते.
तिसरी त्याच्याकडे जन्म घेते.
पहिली त्याच्यासाठी जीवाचं रान करते.
दुसरी त्याला जीव लावते.
तिसरी त्याला जीव लावायला शिकवते.
पहिलीचा तो प्राण असतो.
दुसरीला तो प्रिय असतो.
तिसरी त्याला प्राणाहून प्रिय असते.
पहिली त्याला संस्कार देते.
दुसरी प्रेम देते.
तिसरी सुख देते.
त्याला ठेच लागताच -
पहिलीचे नाव त्याच्या तोंडात येते,
दुसरीच्या डोळ्यात पाणी येते.
तिसरी त्यावर फुंकर घालते.
पहिलीचा तो 'बाळ' असतो.
दुसरीचा 'नवरा' असतो.
तिसरीचा तो 'बाप' असतो.
*शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा !*
-अज्ञात
-Avinash.D.Murumkar
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३
धोकादायक.... निर्णय.....
नमस्कार....!
आज मी आपल्या समोर एक अत्यंत महत्वपूर्ण विषय मांडणार आहे....(कृपया आपण तो वाचवा व गांभिर्याने दखल घ्याल ही अपेक्षा....!)
मित्रांनो आपण पाहत आहोत, गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच उलाढाली निर्माण होत आहेत यातून स्पष्ट पणे दिसून येत आहे की येणाऱ्या काळात आपल्यासारख्या हजारो युवांचे भवितव्य हे धोक्यात असेल हे आपण खालील काही मुद्द्यांद्वारे समजून घेऊ..
1)ZP/तलाठी/ग्रामसेवक /महाराष्ट्र DTP ;
यासारख्या परीक्षा सरकार TCS/IBPS यांच्या माध्यमातून घेत असते मित्रांनो विचार करण्याजोगी गोष्ट आहे की, अशा परीक्षा ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकाद्वारे किंवा जास्तीत जास्त तांत्रिक गोष्टींचा वापर करून घेतल्या जात असतात. तेव्हा हे आपल्याला मान्य आहे की यावरती खर्च हा जास्त होतो यासाठी पैसा लागतो परंतु या सगळ्याचा विचार करता हे पण खरे आहे की या परीक्षा समाजासाठी, राष्ट्रसाठी ,सेवक देत असतात त्यामुळे सरकारची ही जबाबदारी आहे की यावरील खर्च ते स्वतःच्या तिजोरीतून भरतील व स्वतःसाठी, स्वतःच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी, धोरणांसाठी चांगले सक्षम स्वरूपाचे अधिकारी ,सेवक मिळवण्याचे ध्येय ठेवतील. परंतु वरील परीक्षांसाठी शासनाने 900 ते 1000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून परीक्षा फी म्हणून घेतले आहेत, आणि त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटर दोन-तीन जिल्हे सोडून तिसऱ्या जिल्ह्याकडे येते त्यावेळी त्याचा जाण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च या सगळ्या विचार करता सामान्य परीक्षा किंवा गट क सारख्या परीक्षांना इतकी परीक्षा फी घेणे म्हणजे हे जाणून-बुजून विद्यार्थ्यांवरती काढलेला रोष किंवा मग विद्यार्थ्यांना पैशाची खान समजणे.... काही व्यक्ती बोलतात की विद्यार्थ्यांना परीक्षेचं गांभीर्य राहावं म्हणून आम्ही पैसे घेतो मला वाटते की सरकारने विद्यार्थ्यांना गांभीर्य दाखवायच असेल तर त्यासाठी परीक्षा अधिकाधिक कठीण करावी परीक्षा प्रणालीचे नियम अधिक कठीण करावेत परीक्षेचे आयाम बदलावेत हे सरकार विचारात न घेता, सरकार गोरगरिबांच्या लेकराकडून हजारो रुपये काढत आहे एकीकडे भारतासारखा देश विकसित स्थितीत असताना अनेक क्षेत्रात उलाढाल होत आहे नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि यामध्ये हजारो मुलांचा ओढा हा नागरी सेवन कडे जाण्याचा सुद्धा दिसून येतो आणि अशा परिस्थितीत यूपीएससी सारखी परीक्षा विद्यार्थ्यांकडून फक्त शंभर रुपये घेते एमपीसी सारखी परीक्षा विद्यार्थ्यांना अत्यल्प खर्चात परीक्षा देण्याची संधी देते परंतु त्याचवेळी सरकार दुसऱ्या मार्गाने हजारो रुपये गोर गरिबांच्या लेकरांकडून घेत आहे मित्रांनो हा मुद्दा राजकीय नाही आहे न हा मुद्दा कोणत्या एका वर्गाचा आहे हा मुद्दा आपल्या सगळ्या युवांचा आहे आपल्या घरामध्ये बहिणी बाळा सगळे लहान मोठे थोर या सगळ्यांसाठीचा हा मुद्दा आहे म्हणून आपण सर्वांनी जागे राहिला पाहिजे मी मुळीच म्हणत नाहीये की तुम्ही आंदोलन करा रस्त्यावरती उतरा परंतु मी हे मात्र नक्की म्हणतोय की तुम्ही स्वतःच्या हातासाठी जागा तुमच्यावर होत असलेल्या अन्यायविरुद्ध तुम्ही उभे रहा लोकशाहीने जो अधिकार दिलाय त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा जर हे असंच चालू राहिलं तर मित्रांनो भविष्यात तुमच्या लेकरा बाळांना तुमच्या भावा बहिणींना तुम्ही काय उत्तर द्याल हे तुम्हीच ठरवा कारण त्यांचं भविष्य धोक्यात हे केवळ तुमच्यामुळे येणार आहे कारण आज ही वेळ तुमच्यावर आली असूनही तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवत नाही आहात आणि हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे...
2) कंत्राटी भरती....
मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारने घोषणा केली की सुमारे दीड ते दोन लाख पदे ही महाराष्ट्रातील कंत्राटी भरती भरली जाणार आहेत. मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या किंवा शिक्षण घेणारे तर कोणत्याही विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो त्याचा आवाका पाहता प्रत्येक विद्यार्थ्याचं हे ध्येय असतं की मला प्रशासकीय सेवेत संधी भेटावे आणि अशा वेळेस जर सरकार कंत्राटी भरतीच्या मार्गाने अधिकारी घेणार असेल तर यामध्ये आपल्या सर्वांचं भविष्य धोक्यात आहे. कारण जो विद्यार्थी 12-12/18 -18तास अभ्यास करत वयाचे चार-पाच वर्ष घालवतो आणि त्यानंतर सरकार जर असे डायरेक्ट कंत्राटी भरती मार्गाने अधिकारी घेत असेल तर यामध्ये गोरगरिबाच्या लेकरांनी कुठे जायचे? एससी एसटी ओबीसी सारख्या समाजाची स्थिती पाहता आता कुठेतरी ते नव्याने वरती येत असताना दिसत होते शासन निर्णयामध्ये त्यांचा सहभाग दिसायला सुरुवात झाली होती आणि अशाच वेळेस सरकारी असे निर्णय घेऊन कुठेतरी या वर्गावर ती अन्याय करताना दिसून येत आहे! एवढेच नव्हे तर कंत्राटी भरती मध्ये पैशाचा निव्वळ बाजार होईल ज्याच्याकडे जास्त पैसा तशा पोरांना घेऊन घेण्यात येऊ शकतं आज आपण तलाठी सारख्या परीक्षेला पाहतो परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपामध्ये असली तरीही परीक्षा केंद्रावर ती किती गोंधळ होतात आणि कागदपत्रांची अदलाबदल करून कितीतरी विद्यार्थी वर्ग हा सेवेमध्ये जात आहे याच्यातून गरिबांच्या लेकरांवरती अन्याय हा मात्र नक्की, मित्रांनो काहीजण नाही वाटू शकतं की चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राचा विकास होईल जिथे एका अधिकाऱ्याला पंचायत पन्नास हजार रुपये पगार द्यायची गाडी द्यायची राहिला घर द्यायचं त्याऐवजी तेवढ्या पैशांमध्ये इकडे कंत्राटी भरती मध्ये 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट वरती आपण तीन-चार युवांना कामही देऊ शकतो व त्यांना नोकरीवर ही येण्याची संधी मिळेल परंतु मित्रांनो कंत्राटी भरती नावामध्ये सगळं काही आहे तुम्ही जेव्हा शासन व्यवस्थेत जाता तेव्हा तुम्हाला काहीतरी ऑथॉरिटी असते तुम्हाला काहीतरी हक्क असतात तुम्ही कोणाचे तरी उत्तरदायी असतात परंतु अशी कंत्राटी भरती झाली तर नक्कीच अधिकारी वर्गामध्ये शासनाची एक भीती राहील तसेच यामध्ये भेदभाव होण्याची शक्यता आहे प्रत्येक जण आपल्या जवळील माणूस पुढे कसा जाईल यासाठी हात पसरवेल त्यामुळे ही कंत्राटी भरती अतिशय धोक्याची आहे कारण यातून एक नुकसान राज्याचे आहे यातून शिक्षित वर्ग हा शासन निर्णयात सहभागी असेल याची कोणतीही खात्री देता येत नाही कारण हे उघडपणे दिसत आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये सरकार कंत्राटी भरती जरी घेतली तरी यासाठी एक परीक्षा ठेवेल परंतु मित्रांनो ही परीक्षा काही दिवसांनी फक्त नावाला राहील व यातून असा वर्ग वरती जाईल जो अनुभवी नसेल ज्ञानी नसेल फक्त तो वर्ग पैशाच्या जोरावर ती जाईल आणि पुन्हा भारत पण पारतंत्र्यात असल्याच्या समान स्थिती महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये निर्माण होऊ शकते आणि जो विद्यार्थी वयाची चार-पाच वर्षे वाया घालून अभ्यास करत आहे असा विद्यार्थी कायमच मागे लोटला जाईल त्यामुळे आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे आपण सर्वांनी याच्या विरोधात विनंती अर्ज बैठका याच्या मार्फत तुम्ही तुमचे मते सरकारच्या समोर उभा केले पाहिजेत कारण आज जर तुम्ही याविरुद्ध बोलला नाहीत तर तुमचे भविष्य फार धोक्यात येईल आणि केवळ तुमचेच नाही तर येणाऱ्या पिढीला तुम्ही उत्तर काय द्याल हे तुम्ही ठरवा कारण तुमच्या मुलाबाळांचे भविष्य पूर्णतः धोक्यात येणार आहे ज्या परीक्षेचं स्वप्न तुम्ही ज्या लाल दिव्याच्या गाडीचा स्वप्न तुम्ही पाहता ते स्वप्न तुमचं कदापि पूर्ण होणार नाही त्या शासन व्यवस्थेत तीच लोक बसतील जे पैशाच्या जोरावरती वरती जातील त्यामुळे तुम्हा सर्वांना याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे सर्व व्यवहारे एकत्र येणे गरजेचे आहे आणि एवढेच नव्हे तर येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला निवडून दिलं पाहिजे याचा स्वतः विचार करा कारण आज महाराष्ट्राची स्थिती पाहता कोण कोणत्या ठिकाणी आहे आणि कोण कोणामध्ये सामील आहे की कोणी काहीच महाराष्ट्राला समजत किंवा समजत नसल्याचे काही लोकांना वाटते परंतु तुम्ही ते दाखवून द्या मित्रांनो आपण आजपर्यंत या लोकांना सहन केलं समजलं या लोकांना मतदान करून यांना पाठवलं मित्रांनो तरीही आपल्यावर अन्याय होतोय तरी आपल्या विरोधातले निर्णय होत आहेत मी प्रचंड कळकळीने आणि तळमळीने माझ्या युवा वर्गाला विनंती करतो की आपण एक नव्या युगाला सुरुवात करूया ज्या लोकांना आजपर्यंत शासन व्यवस्थेत जाण्याची संधी भेटली नाही अशा लोकांना तुम्ही या वेळेचे मतदान द्या आणि मतदान देत आणि हाच विचार केला की गेल्या अनेक दशकांपासून आम्ही यांना सहन करतोय परंतु यांच्याकडून तर काही झालं नाही निदान आता नवीन लोकांना संधी देतोय त्यांचा कदाचित थोडासा त्रास सहन करू पण निदान ते आम्हा युवा वर्गाचे भविष्य तरी धोक्यात घालणार नाहीत या अपेक्षेने तुम्ही नवीन लोकांना संधी द्या आणि जरी भविष्य आपले झालंच उध्वस्त त्यांच्याकडून तरी ते आपण पाहून घेऊ कारण गेली 60 70 वर्ष दहा-पंधरा वर्ष आपण ज्या लोकांना संधी देतोय त्या लोकांकडूनही आपल्या भविष्य धोक्यात चाललंच आहे निदान नवीन लोकांना संधी देऊन आपल्या भविष्यात काय होईल का याचा विचार तरी करूया त्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही जागरूक व्हा तुमच्या हक्कासाठी तुम्ही लढा कारण जर आज नाही तुम्ही जागे झाला तर तुम्ही कधीच जागे होणार नाही आणि लोकशाहीच्या नावाखाली कायमस्वरूपीच हुकूमशाही नांदवली जाईल त्यामुळे विचार करा तुमचं एक मत ही तुमचं भविष्य घडू शकतं तुमची एकता ही तुमचं उद्याचं भविष्य असेल त्यामुळे तुम्ही सर्वांनी जागे व्हा जागे व्हा जागे व्हा.....!
3) मित्रांनो परीक्षेच्या माध्यमातून सरकारने प्रचंड पैसा कमावला आहे कारण कोणत्याही तांत्रिक प्रणालीचा जेव्हा परीक्षेसाठी उपयोग होतो तेव्हा विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असले तरी उर्वरित खर्च हा सरकारच्या तिजोरीतून होतो परंतु इथे एका विद्यार्थ्याकडून हजारो रुपये लुटले जात आहेत एकीकडे यूपीएससी सारख्या परीक्षेतून पास होणाऱ्या प्रत्येक मुलाचे हे स्वप्न असतं की त्याला देश पातळीवरील सेक्रेटरी हे पद भूषवता यावं परंतु आज सरकारची धोरण पाहता ती पदे सुद्धा सरकार डायरेक्ट कंत्राटी मार्गाने भरती करत आहे मित्रांनो सेक्रेटरी च्या पदापर्यंत जाण्यासाठी आयुष्यातील खूप दिवस मोजावे लागतात अगदी सेवानिवृत्तीच्या काळात केवळ काही वर्षासाठी आपल्याला ते पद मिळत असते आणि अशा वेळेस सरकार तुम्हा लोकांचा विचार न करता खाजगी मार्गाने कंत्राटी मार्गाने अनुभौजन्य लोकांच्या नावाखाली अशी डायरेक्ट भरती करत आहे त्यामुळे तुम्हा लोकांचा रोल हा शासन निर्णयात खूप कमी होत चालला आहे आणि भविष्यात हा शून्य टक्क्यांवर येऊ शकतो आणि याचा सगळ्यात मोठा तोटा हा शेतकर्याच्या पोरांना व गोरगरिबांना सहन करावा लागू शकतो त्यामुळे आपण कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला सत्तेत बसवायचं की तुम्ही ठरवा कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताने या सरकारच्या माध्यमातून खूप मोठं यश घातलेले असले तरीदेखील बऱ्याच गोष्टी हा तुमच्यासमोर आल्या नाहीत याचे तोटेही फार मोठे मोजावे लागले आहेत आपल्या पर्यावरणाचं ही नुकसान खूप झालेला आहे आणि खूप होत आहे कित्येक तरी नियमांना सरकारने कोरोना काळात केवळ कोरोना लाटीच्या नावाखाली दुजारा देत पर्यावरणाशी अत्येक छेडछाड केली आहे. मित्रांनो हे कायद्याच्या गोष्टी आहेत ज्या मी येथे बोलू इच्छित नाही. परंतु ,
माझं एवढंच म्हणणं आहे की एक वेळेस देश पाच वर्षांनी मागे राहिला तरी चालेल परंतु देश पुढे चालत असताना सर्वांना सोबत घेऊन व सर्वांचा विकास कसा होईल तोही शाश्वत मार्गाने हे महत्त्वाचे आणि म्हणूनच मला म्हणायचे आहे आपल्याला महासत्ता होण्यासाठी किंवा जगातील मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी पाच दहा वर्षाच्या जास्त वेळ लागला तरी चालेल पण अशा लोकांना वरती निवडून द्या जी लोक तुमच्या हिताचं तुमच्या हक्काचं तुमच्या विचारांचा मतांचं योग्य ते मूल्यमापन करतील योग्य तो तुम्हाला न्याय देतील तुमच्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या पुढील भविष्यासाठी भारताच्या उद्याच्या भविष्यासाठी दूरदृष्टीने विचार करतील ...
तेव्हा यावेळी माझे मतदान माझ्या भविष्यासाठी...!
धन्यवाद!
भेटत राहू ....
#सर्वोपरी_राष्ट्र
- M.AVINASH


