गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२६

सह्याद्री वाचवा...!


 


महाराष्ट्राचे वैभव आणि जैवविविधतेचा मुख्य कणा असलेला 'सह्याद्री' (पश्चिम घाट) सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यालगतच्या कर्जत (सायडोंगर) भागात एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि सह्याद्रीच्या संरक्षणाचा प्रश्न का महत्त्वाचा आहे,


📡प्रकल्प नेमका काय आहे?

                          रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर भागात 'टॉरेंट पॉवर' (Torrent Power) या कंपनीचा ३,००० मेगावॅट क्षमतेचा 'पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प' प्रस्तावित आहे. वाढत्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जेला स्थैर्य देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वनजमिनीचा वापर आणि वृक्षतोड होत असल्याने वादाला तोंड फुटले आहे.



                         दुसरीकडे, महाराष्ट्र वन विभाग आणि शासनाने यासंदर्भातील आक्षेप फेटाळत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या मुख्य हद्दीत किंवा कोणत्याही संरक्षित क्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड होत नाही आहे. हा प्रस्तावित प्रकल्प अभयारण्य आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर, म्हणजेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या (Eco-Sensitive Zone) पूर्णपणे बाहेर आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या कायदेशीर प्रक्रियेतून देण्यात आल्या आहेत. तसेच, झालेल्या वृक्षतोडीची भरपाई करण्यासाठी टॉरेंट कंपनी आणि वन विभागामार्फत एकूण ९०,००० नवीन झाडे लावली जाणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
                             परंतू, यांना आहे ही झाडे जगवता येत नाहीत-दरवर्षी आहे  त्याच खड्ड्यात झाडे लावतात . झाडे लावणे म्हणजे सरकारचा फोटोशुट चा कार्यक्रम झाला आहे!  विकासाच्या नावाखाली मोठी झाडे तोडून लहान झाडे लावणे म्हणजे "हातचं सोडून , धावत्याच्या मागे लागण्या समान आहे". बर हे सर्व जाउदेत तिथल्या जैवविविधतेचं काय? प्राणी, पक्षी, कीटक, दुर्मिळ वनस्पती या सर्वांच काय? आज या जंगलतोडीमुळे तिथल्या हजारो पक्षांचा, प्राण्यांच्या अधिवास नष्ट होत आहे, माणसा प्रमाणे त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे हे आपण विसरतोय; शेवटी हे नैसर्गिक चक्र सर्वांच्या अस्तित्वाने पुर्ण होत आहे याच भान आपल्याला आज राहिलेलं नाही. आज असे प्रकल्प जवळ जवळ २३ येणार आहेत सह्याद्रीत, टॉरेंट कंपनी ही केवळ सुरुवात आहे. सह्याद्रीला लागलेली किड आहे आणि याला वेळतच ठेचाय हवं,आज आपण शांत बसलो तर उद्या ही जंगल बाघाय भेटणार नाहीत. महाराष्ट्राचा वाळवंट होतोय चित्र समोर आहे,आता तरी प्रदेशवाद आपला जागा झाला पाहिजे, या गुजराती कंपन्यांच महाराष्ट्र येणं हे केवळ योगायोग नाही तर दुरदृष्टीचे षडयंत्र आहे, आता जाग होण गरजेच आहे...आज अशक्य अस काही नाही, जर समुद्रातुन बोगदा करता येत असेल तर समुद्राच्या पाण्यावर लाईट सुद्धा बनवता येईल तेव्हा सरकारने निसर्गाच्या सान्निध्यात प्रकल्प उभारून "आयत्या पिठावर रेगुट्या वोढू नये"! सरकारी ने इच्छाशक्ती दाखवली आणि उद्योगपतींच्या हाताखालीचे माकड न होण्याचे ठरवले तर थोडा वेळ जाईल पण समुद्राच्या पाण्यावर लाईट होवु शकते यात शंका नाही, आणि या कंपन्यांना खुप खाज असेल विकासाची तर गुजरात मधे लाईट तयार करावी!


झाड तोडून विकास होत नाही! 

                                     आज आपण ज्याला 'विकास' म्हणतोय, तो जर आपल्या ऑक्सिजनचे स्रोत, पाण्याचे साठे आणि वन्यजीवांची घरे उद्ध्वस्त करून येत असेल, तर त्याला विकास म्हणायचे का? एक झाड कापायला काही मिनिटे लागतात, पण तेच झाड पूर्ण वाढून निसर्गाला समृद्ध करायला अनेक दशके लागतात. कागदावर '९० हजार नवीन झाडे लावू' असे आश्वासन देणे सोपे असते, मात्र शेकडो वर्षांची जुनी जंगले आणि तिथली नैसर्गिक परिसंस्था (Ecosystem) एका रात्रीत नवीन रोपे लावून परत आणता येत नाही. 
सह्याद्री हा महाराष्ट्राचा केवळ एक डोंगर नाही, तो आपला नैसर्गिक विमा (Natural Insurance) आहे. जर आपण विकास प्रकल्पांच्या नावाखाली इथली जंगले अशीच नष्ट करत गेलो, तर भविष्यात हवामान बदल, तीव्र दुष्काळ आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याच्या आपत्तींना आपल्यालाच सामोरे जावे लागेल. 
खरा विकास तोच असतो जो निसर्गाला सोबत घेऊन चालतो. सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी जर आपण सह्याद्रीची हिरवी जंगले नष्ट करणार असू, तर तो विकास नसून स्वतःच्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. आता वेळ आली आहे की आपण 'निसर्गाची किंमत मोजून होणाऱ्या विकासाला' ठामपणे नकार दिला पाहिजे!

                                                                                                         लेखक- अविनाश मुरूमकर 



     
                                      

                                                                                                                    सौजन्य -बोलभिडू


                                                                                                     






1 टिप्पणी:

  1. नमस्कार...., आम्ही या लेखातुन सत्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला हा लेख वाचून काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.

    उत्तर द्याहटवा