![]() |
| मा.रतन टाटा |
Dear sir,
आपल्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर आपल्याला भेटण्याची फार मोठी इच्छा होती, मुंबई आल्यावर भेटण्याचा प्रयत्न देखील करणार होतो. त्यापुर्वीच आपल्या जाण्याची बातमी मिळाली. सर, आपल योगदान, आपलं कार्य, तो साधेपणा, समाज्याप्रतिची भावना, देश प्रेम किती विविधांगी रूपे होती ; आपल्या सारखी व्यक्ती पुन्हा होणे नाही!
सर, सन 2023 साली आपल्याला भारतरत्न मिळावा यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्याचं ठरविले... त्यानुसार माझ्या मित्रांनी आणी मी स्वाक्षरी देखील केली...पुढे अभियान राबविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याआधी थोडी माहिती घ्यायचं ठरवलं.... तेव्हा समजले की माझ्या आदी देखील.... खुप जाणांनी स्वाक्षरी अभियान, ट्विटर_हॅशटॅग वापरत सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला होता... किंबहुना ही लढाई आपल्याला भारतरत्न मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) देखील गेले. तरीही सरकारला काही पाझर फुटला नव्हता, शेवटी आपण स्वतः पुढे येवून विनंती केली की, हे सर्व थांबवा ! तेव्हा मला वाटले की माझ्या स्वाक्षरी अभियानाने फार फरक पडेल असं दिसत नाही. आणि मग स्वाक्षरी अभियान थांबवल. परंतु मला आतुन नेहमी अस्वस्थ जाणवत असे, काही तरी राहतय, मी प्रयत्न केले नाहीत ही गोष्ट मला शांत बसु देत नव्हती. नंतर ठरवलं की अधीकारी वगैरे झाल्यावर... सरकार पर्यंत पोहचायला सोपं होईल; तसं मनाला पण वेळोवेळी सांगत आलो. शेवटी काही दिवसांपूर्वी आपली प्रकृती चिंताजनक असल्याने हॉस्पिटलमध्ये ICU विभागात ठेवल्याचे समजले.
आणि फार भिती वाटू लागली दोन तीन दिवस उलटून ही आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समजली नाही. तेव्हा तातडीने भारत सरकारला पत्र लिहायचे ठरवले... आणि 8/10/2024 रोजी दुपारी पत्राचा ड्राफ्ट तयार केला; स्वाक्षरी केली आणि 9/10/2024 रोजी राष्ट्रपती, प्रधानमंत्री कार्यालय आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्र पाठविले.. त्या पत्राचा शेवचा मजकूर कहीसा असा होता...
"इतिहास सब की नोंद लेता है । और मै चाहता हूं की इतिहास हमेशा भारत का गौराणवित हो; जिसमे भारत के प्रती आपणा योगदान देणे वालों की नोंद रहे ।
उणके पश्चात उनको भारतरत्न दिया गया तो उसका कोई अर्नथ नहीं रहेगा, इसीलीए मै चाहता हूं की सरकार उणके जितेजी उणका हक उन्हे दे । उनको भारतरत्न देणे से भारतरत्न की भी शोभा बढेगी , उनकी तबीएत दिन भर दीन बिघडती जा रही हैं। रतन टाटा जी की , बिघडती तबीएत उन्हे हमसे जदुा करणे से पहले कृपया उन्हे भारतरत्न प्रधान करें।"
आणि रात्री आपल्या जाण्याची बातमी मिळाली, खुप मोठा धक्का होता अश्रू अनावर झाले... शेवटी आपल्याला जिवंतपणी आम्ही भारतीय भारतरत्न देऊ न शकल्याचं दु:ख आहे. शक्य झाल्यास मला माफ करा. शेवटी एवढंच म्हणेल आपल्या मरणोपरांत तरी भारतरत्न आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. थांबतो आता...या पलीकडे लिहणे शक्य नाही अश्रू अनावर झालेत... आपल्या आत्म्यास शांती लाभो...! माझ्या महान व्यक्तीमत्वला माझा आखेरचा सलाम!!
