शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

The great Geographer Aryabhatta / महान भूगोल शास्त्रज्ञ आर्यभट !

         महान भूगोल शास्त्रज्ञ आर्यभट !

 


प्रतिभेची ज्योती आणि उपेक्षेचा अंधार यातील सुप्त संघर्षाच्या कहानीचे दुसरे नाव आहे - आर्यभट. मुळात 'ज्योतिशास्त्र' हा शब्दच 'ज्योति:शास्त्र' पासून आला आहे. वैदिक ज्योतिष म्हणजे 'वेदांग ज्योतिष्य'. हा प्रत्यक्ष वेदांचा भाग नसून वेदांची छंद, निरुक्त, व्याकरण इ. सहा अंगांपैकी एक आहे. ऋग्वेद चारही वेदांचे वेदांग ज्योतिष ग्रंथ आहेत. त्यांचा काळ इ. स. पूर्व १५०० मानला जातो. त्यातुन पुढे ब्राह्म, पौलिश, रोमन, वसिष्ठ व सूर्य हे पाच ज्योतिष्य सिद्धांत विकसित झाले. पण नंतर त्या पाचही सिद्धांतांतील सूत्रे आणि गणिते यांचा ताळमेळ प्रत्यक्ष निरीक्षणाशी लागेणा . अर्थातच वेदांग ज्योतिषानंतर सुमारे दीड हजार वर्षांच्या काळातील ज्योतिषावरचा ग्रंथ उपलब्ध नाही.


या सर्व पार्श्वभूमीवर पाचव्यात आर्यभट नावाची ज्योत प्रकटली. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल माहिती उपलब्ध नाही. इ. स. ४७६ मध्ये त्यांचा जन्म व शिक्षण बिहारमधील कुसुमपूर (बहुधा सध्याचे पाटणा) या गावी झाले. आर्यभट हे 'कुलप' म्हणजे कुलपती होते असा उल्लेख आहे. यावरुन ते नालंदा विद्यापीठात खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख प्रमुख असावेत. बिहारमधील तारेगना येथे आरभटांनी वेधशाळा उभारली होती असेही मानले जाते. त्या सुमारास गुप्त उतरणीस लागले होते. पण नालंदा हे जगातील मोठे ग्रंथालय व  ज्ञानकेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. तिथे एक  वेधशाळा ही होती. बहुधा तिथेच आर्यभटांनी आपला 'आर्यभटीय' हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. ते वर्ष होते इ. स. ४९९ आणि त्या वेळी त्यांचे वय होते २३. ज्योतिष सिद्धांत प्रत्यक्ष निरीक्षण यातील त्रुटी या ग्रंथामुळे दुर झाल्या . हा ग्रंथ ब्राह्मसिद्धांतावर आधारित असून त्याची विभागणी दशगीतकापाद, गणितपाद कालक्रियापाद व   गोलपाद या चार भागात केलेली आहे. पर्याय आहे.  सांकेतिक संख्यालेखन पद्धतीचा वापर करून लिहिलेला असल्याने तो वरकरणी क्लिष्ट व दुर्बोध वाटला तरी श्लोकबद्ध रुपात त्यात अतिशय  कमी शब्दांत प्रचंड माहिती आहे. १२३ श्लोकांच्या या ग्रंथातील आशय, सूत्रे व तपशील पुर्ण  उलगडून मांडायचा तर शेकडो  पानांचे ग्रंथ होतील. त्यातील सुत्रे व आकडेवारी  अद्ययावत तुलनेतही अचुक  ठरलेली आहे. त्यापैकी काही  उदाहरणे अशी.... आर्यभटांनी दिलेला एक नक्षत्रदिनाचा  कालावधी  २३ तास ५६ मिनिटे ४.१ सेकंद आहे, तर त्याचा आधुनिक कालावधी २३ तास ५६ मिनिटे ४.०९१ सेकंद आहे. त्यांनी दिलेला शुक्राचा युतीकाल ०.६१५२० एवढा आहे, तर आधुनिक युतीकाल ०.६१५२१ एवढा आहे. ग्रहांची सूर्यापासून त्यांनी दिलेली तुलनात्मक सरासरी अंतरे  पुढीलप्रमाणे आहेत. आधुनिक अंतरे कंसात दिली आहेत. बुध ०.३७५ (०.३८७), शुक्र ०.७२५ (०.७२३), मंगळ १.५३८ (१.५२३), गुरु-५.१६ (५.२), शनी-९.४१ (९.५४). याचप्रमाणे चंद्र, बुध, मंगळ, गुरू व शनी यांचा नक्षत्रभ्रमण काळ त्यांनी  जवळपास अचुक दिला आहे.


ग्रहणे ही राहू-केतू मूळे नव्तहे तर चंद्राच्या छायेमुळे लागतात हे आर्यभटांनी दीड हजार वर्निःषांपूर्वी नि:संदिग्धपणे सांगितले. पृथ्वीच्या छायेची लांबी त्यांनी अचुक दिली आहे . आश्चर्य म्हणजे  चंद्रावर १५ दिवसांचा दिवस आणि १५ दिवसांची रात्र असते, हेही त्या काळात त्यांनी नोंदविले.


पृथ्वी गोल  असुन ती स्वता: भोवती फिरते व त्यामुळे दिवस-रात्र, हे सांगणारे आर्यभट पहीलेच भूगोलतज्ञ होते. या परिवलनासाठी त्यांनी 'भूभ्रम' असा शब्द वापरला. यासाठी नदीप्रवाहात नावेतून जाताना काठावरील वस्तू मागे जाताना दिसतात हे उदाहरण त्यांनी दिले. इतकेच नाही तर पृथ्वीच्याच परिवलन गतीने (२४ तासात एक फेरी) फिरणाऱ्या गोलयंत्राची माहितीही त्यांनी गोलपाद या भागात दिली आहे. दुर्दैवाने पुढे वराहमिहीर, ब्रह्मगुप्त इ. नी आर्यभटांची ही परिवलन संकल्पना फेटाळली व हा सिद्धांत दुर्लक्षित राहिला. आर्यभटांचा 'आर्यभट सिद्धांत' नावाचा आणखी एक ग्रंथ होता. वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, इ.नी त्याचा उल्लेख केलेला आहे. मात्र एकेकाळी भारतभर पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जाणारा 'आर्यभट सिद्धांत' हा ग्रंथ आता उपलब्ध नाही.


    त्याच सुमारास वराहमिहीर हे गुप्त राजांच्या दरबारात ज्योतिषी होते. इ. स. ५०५ मध्ये त्यांनी पंचसिद्धांतिका हा खगोलशास्त्रीय ग्रंथ लिहिला. याशिवाय त्यांचे 'बृहत्संहिता' व इतर अनेक ग्रंथ आहेत. तारे, ग्रह, ग्रहणे, धूमकेतू इथपासून ते ढग आणि भूकंपापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लिहिले आहे. वराहमिहिरांनी भविष्य व फलज्योतिष्य यावरच भर दिला नसता तर ते पहिले मोठे भूगोल संशोधक ठरले असते. त्यानंतर भास्करचार्य पहिले यांनी ५२९ मध्ये आर्यभटियावर भाष्य आणि महाभास्करीय व लघुभास्करीय हे दोन ग्रंथ लिहिले.


         पुढे बह्मगुप्त यांनी इ. स. ५९० मध्ये ब्राह्मसिद्धांत व ६३० मध्ये खंडखाद्यक हे ग्रंथ लिहिले. दहाव्या शतकात या ग्रंथांची 'सिंद हिंद' व 'अल अर्कंद' ही अरबी भाषांतरे झाली. त्या ग्रंथामार्फतच दशमान पद्धत व शून्याचा शोध अरबस्तानात गेला. पण या सर्वांहून आर्यभट वेगळे व महान ठरले. भविष्य व फलज्योतिष्याचा मोह टाळून आपल्या पूर्ण ग्रंथाचे विशुद्ध शास्त्रीय स्वरूप त्यांनी कायम राखले. त्यामुळे अचूकता, सूक्ष्मता आणि नावीन्यपूर्ण पद्धती असणारा त्यांचा ग्रंथ जगप्रसिद्ध झाला. नवव्या शतकात बगदादमध्ये 'आर्यभटीय'चे अरबीत भाषांतर करण्यात आले. विद्वान इतिहासकार अलबेरुनी यांच्या १०३० मधील 'अलबेरुनीचा भारत' मध्ये आर्यभटांचा वारंवार उल्लेख आहे. अल फाझरी व याकूब यांनी 'आर्यभटीय' चे भाषांतर पूर्वीच अरबीत केल्याची माहिती अलबेरुनींनी दिली आहे. डॉ. केर्न या नेदरलँडच्या विद्वानाने १८७४ मध्ये 'आर्यभटीय'चे इंग्रजीत भाषांतर केले. आधुनिक काळात अनेक पाश्चात्त्य विद्वानांनी आर्यभटांना गौरविले आहे.


   पण भारतात मात्र आर्यभट हे आपल्या भूगोल व विज्ञानाच्या उपेक्षेचे प्रतीक ठरले. कदाचित भविष्यकथन आणि फलज्योतिष्य या लोकप्रिय व राजाश्रयी मार्गापासून दूर राहण्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. दीड हजार वर्षे राज्यकर्ते व इतर विद्वानांनी आर्यभटांची नोंदच घेतली नाही. त्यांचा मृत्यू इ. स. ५५० मध्ये झाला असे मानले जाते.

    पण तो नक्की केव्हा, कुठे झाला हेही अज्ञात आहे. इ.स. ५२५ ते १५०२ या काळात 'आर्यभटीय'वर प्रभाकर, भास्कराचार्य, इ.नी काही भाष्ये लिहिली. पण पुढील ५०० वर्षे, ग्रहणात पृथ्वीच्या सावलीची लांबी सांगणारे आर्यभट आणि त्यांची भूगोल व खगोलविद्या हे सारे विस्मृतीच्या काळोखात हरवून गेले. त्या काळातील पुराणे, असंख्य काव्ये, कथा, मिथके आणि सत्य व काल्पनिक चरित्रे यांनी भारतीय साहित्यं भरलेले आहे. पण त्यात किंवा ऋषीमुनींच्या यादीत वास्तवात होऊन गेलेल्या आर्यभटांचे नाव आढळत नाही. हजार वर्षापूर्वी अरबीत व नंतर इंग्रजीतही भाषांतर झालेले 'आर्यभटीय' परवापर्यंत आपल्याचं देशातल्या मराठी भाषेत उपलब्ध नव्हते.


पण हजारो वर्षांच्या उपेक्षेचा काळोखही प्रतिभेच्या तेजाला गिळंकृत करू शकत नाही. ४९ वर्षांपूर्वी अचानक आर्यभट उपेक्षेच्या अंधारातून बाहेर आले. १९७५ मध्ये भारताने आपला पहिला उपग्रह प्रक्षेपित केला, त्याला आर्यभटांचे नाव देण्यात आले विश्वकोश व इतर ग्रंथांत त्यांची माहिती प्रकाशित होऊ लागली. जगप्रसिद्ध प्रतिष्ठित 'नेचर'च्या २००१ मधील एका अंकातं आर्यभटांच्या एका कोष्टकावर लेख प्रकाशित झाला. २००९ मध्ये 'आर्यभटीय' वर मराठीत स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झाले. आता त्यांच्या ग्रंथाच्यां अभ्यासाची प्रत्येक विद्यापीठात व्यवस्था करणे हेच त्यांच्या उपेक्षेचे प्रायश्चित्त ठरेल. तीच आर्यभटांना आदरांजली आणि भावी पिढीला प्रेरणा ठरेल.

स्त्रोत: लोकसत्ता, 

लेखक : श्री.एल.के.कुलकर्णी (भूगोल अभ्यासक)

E-mail: lkkulkarni@gmail.com


By,

Mr.Avinash D.Murumkar






शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

"सन्मानाने मृत्यू"साठी मार्गदर्शक तत्वे....


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अत्यवस्थ रुग्णाच्या परिस्थितीमध्ये उपचाराने सुधारणा होण्याची शक्यता नसल्यास अशा रुग्णांना सन्मानाने मृत होण्याचा हक्क दिला आहे. मात्र रुग्णाचे इच्छापत्र/सहमतीपत्र आवश्यक..!



सन्मानाने मृत होण्याचा अधिकार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने वैद्यकीय समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन स्तरावर स्थापन करण्यात आली आहे. 

इच्छापत्र करण्यासंदर्भात कार्यपद्धती व अंमलबजावणीची कार्यपद्धती न्यायालयाने निश्चित केली आहे. रुग्णाला त्याच्या इच्छापत्रानुसार सन्मानाने मृत होण्याचा अधिकार बहाल करण्यासाठी विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून 48 तासात निर्णय घेण्यासाठी जबाबदार यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर प्राथमिक वैद्यकीय मंडळ व द्वितीय वैद्यकीय मंडळ स्थापन केले आहे.


इच्छापत्र काय आहे ‌...?

               वैद्यकीय उपचारबाबत डॉक्टरांना सुचना देणारे पत्र म्हणजे इच्छापत्र होय. हे स्टॅम्प पेपरवर केले जाते. औषधोपचार व जीवन साहाय्य उपकरणाने आजारपणात सुधारणा होण्याची शक्यता नसल्यास अधिकचे उपचार न करता सन्मानाने मृत्यूचा अधिकार द्यावा. असे नमूद करावे लागणार आहे.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

 

MANTRALAY
MANTRALAY - MAHARASHTRA GOVERNMENT


         

NEW,

Devendra Fadnavis back as Maharashtra CM, ‘to work together’ with deputies Eknath Shinde, Ajit Pawar


   

The new government was formed after two weeks of negotiations. Mr. Fadnavis said, “Chief Minister or Deputy Chief Minister is just a technical arrangement. The three of us will work together.”


Governor C.P. Radhakrishnan administered the oath of office and oath of secrecy to Mr. Fadnavis, who steered the BJP-led Mahayuti to victory in the State elections last month, in the presence of Prime Minister Narendra Modi, several Union Ministers, and Chief Ministers and Deputy Chief Ministers of NDA-ruled States. Outgoing Chief Minister Eknath Shinde, leader of a breakaway Shiv Sena faction, took the oath as Deputy Chief Minister, alongside Nationalist Congress Party (NCP) president Ajit Pawar. No other leader was inducted into the Council of Ministers, with the Cabinet formation expected next week.