शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

GULJAR/ गुलजार


GULJAR/ गुलजार



                प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना यंदाचा ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.


                 सन १९४४पासून देण्यात येणारा ज्ञानपीठ पुरस्कार दर वर्षी भारतीय साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी योगदानासाठी दिला जातो. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा; तर उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा देण्यात येत आहे. याग्देवीची प्रतिमा, २१ लाख रुपये, आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


                 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. निवड समितीत माधव कौशिक, दामोदर मावजो, प्रा. सुरंजन दास, प्रा. पुरुषोत्तम बिलमाले, प्रफुल्ल शिलेदार, प्रा. हरीश त्रिवेदी, प्रभा वर्मा, डॉ. जानकीप्रसाद शर्मा, ए. कृष्णा राय आणि 'ज्ञानपीठ'चे संचालक मधुसूदन आनंद यांचा समावेश होता.


शब्दांचा जादुगार :-

                 गुलजार या नावाने ओळखले जाणारे संपूरणसिंग कालरा हे प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात; तसेच आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट उर्दू कवींपैकी एक आहेत. गुलजार यांना २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४मध्ये पद्मभूषण सन्मान आणि पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. २००९ मध्ये ऑस्कर पुरस्कार आणि २०१० मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळवलेले 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' हे गाणे आणि 'माचिस' (१९९६), 'ओमकारा' (२००६), 'दिल से... (१९९८) आणि 'गुरू' (२००७) या समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांतील गुलजार यांनी लिहिलेली गाणी विशेष गाजली. गुलजार यांनी 'कोशिश' (१९७२), 'परिचय' (१९७२), 'मौसम' (१९७५), 'इजाजत' (१९७७) या सिनेमांचे आणि 'मिर्झा गालिब' (१९८८) या दूरचित्रवाणीवरील मालिकेचे दिग्दर्शन केले, गुलजार यांनी 'त्रिवेणी' या तीन ओळींचा नथा काव्यप्रकार उर्दूमध्ये आणला, त्यांनी बालकवितेतही योगदान दिले आहे.


 संस्कृत भाषेसाठी ;- जगद्गुरू रामभद्राचार्य 

  उर्दू भाषेसाठी ;-  प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार .





                                                                         -AVINASH D. MURUMKAR



२ टिप्पण्या: